चार वर्षांनंतर भारतात होणार IPL लिलाव? तारीख ठरली, पण त्याच दिवशी IND vs SL सामना... सावळागोंधळ

IPL 2027 Auction Date : विशेष म्हणजे, तब्बल चार वर्षांनंतर आयपीएलचा लिलाव भारतात परतण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
IPL 2027 auction

IPL 2027 auction

esakal

Updated on: 

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव कुठे आणि कधी होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आयपीएल २०२७ च्या लिलावाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यातील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, तब्बल चार वर्षांनंतर आयपीएलचा लिलाव भारतात परतण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com