IPL Valuation Falls Due to Online Gaming Ban 2025
esakal
क्रिकेटविश्वातील सर्वांत श्रीमंत संघटना असलेल्या 'बीसीसीआय'ची प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची स्पर्धा आयपीएलच्या मूल्यांकनात सलग दुसऱ्या वर्षी घट झाल्याचे आर्थिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिओस्टारकडून प्रसारण हक्कांचे एकत्रीकरण झाल्यामुळे बोली लढतीला पूर्णविराम मिळाला आणि ऑनलाइन गेमिंगवरील बंदीमुळे सुमारे दोन हजार कोटींचा फटका बसला असल्याचे कन्सल्टिंग फर्म डी अँड पी अॅडव्हायजरी यांच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.