IPL 2023 News : खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक! विराट कोहली थांबलेल्या हॉटेलमधून...

IPL 2023 News
IPL 2023 News

IPL 2023 News : देशभारात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा माहोल सुरू आहे. देशातील १२ वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवल्या जात आहे. आतापर्यंत (२१ एप्रिल) सर्व १० संघांमध्ये २९ सामने खेळले गेले आहेत. मात्र याचदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची बातमी समोर आली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेबाबत एक नवीन घटना समोर आली असून यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ज्या हॉटेलमध्ये खेळाडू थांबले होते. तिथे तीन अट्टल गुन्हेगारांनी देखील रुम बुक केली होती. यावेळी या तिघांनाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईत अटक केली आहे. चंदीगडच्या आयटी पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मोठी बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींवर गोळीबार आणि इतर गुन्हे दाखल आहेत. आयपीएल संघाच्या हॉटेलमधून तिघांनाही अटक होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

२० एप्रिलला पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील सामना मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने २४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यासाठी आरसीबीच्या विराट कोहलीसह अनेक प्रसिद्ध खेळाडू आयटी पार्कमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमध्ये तीन अट्टल गुन्हेगार देखील थांबले होते. यामुळे पोलीस खात्यात देखील खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे रात्री साडेदहाच्या सुमारास तिन गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

IPL 2023 News
Viral Video : सामन्यानंतर भरली धोनी मास्तरांची शाळा; हैद्राबादच्या खेळाडूंनी घेतलं ज्ञान

ताब्यात घेतलेल्या तरुणांकडे अवैध शस्त्रे असण्याची शक्यता पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरा आरोपींच्या खोल्यांसह संपूर्ण हॉटेलमध्ये शोधमोहीम राबवली. यादरम्यान पोलिसांनी आरोपींसोबत असलेली ब्रेझा कार झडती घेतल्यानंतर जप्त केली आहे.

क्रिकेट संघ हॉटेलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर थांबला होता. पाचव्या मजल्यावर विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंच्या खोल्या होत्या. तर पोलिसांनी आरोपींना हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर बुक केलेल्या खोलीतून अटक केली. यांनी एक दिवसासाठी रूम बुक केली होती.

IPL 2023 News
MS Dhoni Video : रवींद्र जडेजासमोर दाखवत होता 'चतुराई', धोनीने एका झटक्यात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com