IPL 2023 : 'शिवम दुबे कधीही RCB साठी कम्फर्टेबल खेळला नाही...', मिस्टर 360 च्या वक्तव्याने उडाली खळबळ

AB de Villiers on Shivam Dube : मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात शिवम दुबेने दमदार कामगिरी केली.
AB de Villiers on Shivam Dube IPL 2024 News Marathi
AB de Villiers on Shivam Dube IPL 2024 News Marathisakal

AB de Villiers on Shivam Dube : मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात शिवम दुबेने दमदार कामगिरी केली. गुजरातविरुद्ध त्याने तुफानी अर्धशतक ठोकले. आधी 22 मार्च रोजी आरसीबी विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 34 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

शिवम दुबेने आपल्या स्फोटक कामगिरीने क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले. आता आरसीबीचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने दुबेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

AB de Villiers on Shivam Dube IPL 2024 News Marathi
Chandrakant Pandit KKR : लष्करी शिस्तीचा माणूस... केकेआरमध्ये ऑल इज नॉट वेल; कोच चंदू पंडितांवर खेळाडू नाराज, रिंकू सिंगचं नाव....

दुबेने 2019 मध्ये आरसीबीकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने दोन हंगामात एकूण 15 सामने खेळले. यामध्ये त्याला 122 च्या स्ट्राईक रेटने केवळ 169 धावा करता आल्या. यानंतर, फ्रँचायझीने त्याला आयपीएल 2021 मध्ये सोडले.

मग त्यानंतर दुबेला राजस्थान रॉयल्सने घेतले. जेथे त्याने नऊ सामन्यांमध्ये 230 धावा केल्या. पण, फ्रँचायझीने त्याला आयपीएल 2022 पूर्वी सोडले, परंतु धोनीने त्याला CSK मध्ये समाविष्ट केले.

AB de Villiers on Shivam Dube IPL 2024 News Marathi
Babar Azam : आफ्रिदीचे कर्णधारपद धोक्यात... बाबर आझमला पुन्हा मिळणार पाकिस्तान संघाचे नेतृत्व?

गुजरातविरुद्धच्या दमदार कामगिरीसाठी डावखुऱ्या फलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दुबेच्या कामगिरीबद्दल बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, “शिवमला अशाप्रकारे पाहणे खूप भारी वाटत आहे. पण तो कधीही आरसीबीसाठी कम्फर्टेबल खेळला नाही. तो खूप लाजाळू मुलगा होता, खूप मेहनत करायचा आणि दिवसभरात खूप प्रश्न विचारायचा. पण आता मला वाटते की तो काहीतरी शिकला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू पुढे म्हणाला, “तो सीएसके मध्ये स्वतंत्र असल्याबद्दल बोलतो. येथे एक जादु आणि जो धोनी, गायकवाड, स्टीफन फ्लेमिंग आणि भूतकाळातील सर्व लोकांनी तिथे प्रस्थापित केला आहे. हा फ्रँचायझीचा एक वर्कहॉर्स आहे जो प्रत्येक वेळी, प्रत्येक हंगामात, नवीन खेळाडूंसह कार्य करतो जे स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करतात.

आयपीएल 2022 मध्ये, शिवमने 11 सामन्यांमध्ये 156.22 च्या स्ट्राइक रेटने 289 धावा केल्या, तर पुढच्या सत्रात खेळल्या गेलेल्या 16 सामन्यांमध्ये 158.33 च्या स्ट्राइक रेटने 418 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com