DC vs SRH : अभिषेकने केली सुरूवात क्लासेने शेवट; दिल्लीला दोनच फलंदाजांनी चांगलेच दमवले

DC vs SRH
DC vs SRH esakal

DC vs SRH Live : नाणेफेक जिंकून प्रथम फंलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादच्या फक्त दोन फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला जेरीला आणले. सलामीवीर अभिषेक शर्मा (67) आणि हेन्रिच क्लासेनने (53) अर्धशतकी खेळी करत हैदराबादला 20 षटकात 6 बाद 197 धावांपर्यंत पोहचवले. अब्दुल समादने देखील 21 चेंडूत 28 धावा करत क्लासेनला चांगली साथ दिली होती. दिल्लीकडून मिचेल मार्शने भेदक मारा करत 4 षटकात 27 धावा देत 4 फलंदाज बाद केले. दिल्लीचे मुकेश कुमार, नॉर्त्जे आणि इशांत शर्मा हे महागडे ठरले.

DC vs SRH
Vijay Shankar : शंकरने तिसरा डोळा उघडला, गुजरात शानदार विजयासह अव्वल स्थानावर विराजमान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने धडाकेबाज सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने पॉवर प्लेचा चांगलाच फायदा उचलला. मात्र मयांक अग्रवालला मात्र 6 चेंडूत 5 धावाच करता आल्या. त्याला इशांत शर्माने घरचा रस्ता दाखवला.

यानंतर आलेला राहुल त्रिपाठी देखील फार काही चमक दाखवू शकला नाहीत 6 चेंडूत 10 धावा करत तो मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर अभिषेक शर्माने फटकेबाजी करत 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर जवळपास 10 च्या रनरेटने संघाला 8 षटकात 76 धावांच्या जवळ पोहचवले.

एकीकडे अभिषेक शर्मा आक्रमक अवतारात फलंदाजी करत होता दुसरीकडे मिचेल मार्श हैदराबादला धक्क्यावर धक्के देत होता. आधीच राहुल त्रिपाठीची शिकार केलेल्या मार्शने हैदराबादचा कर्णधार एडिन माक्ररमला 8 धावांवर आणि हॅरी ब्रुकला शुन्यावर बाद केले. यानंतर अभिषेक शर्मा 36 चेंडूत 63 धावा करून अक्षर पटेलची शिकार झाला.

DC vs SRH
Hardik Pandya Sunil Gavaskar : हार्दिक कॅप्टन्सीचा वारसा ठेवून... गावसकरांनी पांड्याला तर धोनीच्याच पंक्तीत बसवले

मिचेल मार्शने हैदराबादला पाठोपाठ धक्के दिल्यानंतर अब्दुल समाद आणि क्लासेन यांनी सहाव्या विकेटसाठी जवळपास 5 षटकात अर्धशतकी भागीदारी रचत हैदराबादला 160 धावांच्या पार पोहचवले. मात्र ही जोडी अखेर मार्शनेच फोडली. त्याने 21 चेंडूत 28 धावा करणाऱ्या समादला घरचा रस्ता दाखवला.

समाद बाद झाल्यानंतर क्लासेनने एकहाती किल्ली लढवत 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने हुसैनच्या साथीने हैदराबादला 20 षटकात 6 बाद 197 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com