esakal | कोलकाताला BCCI चा दणका; एका खेळाडूवर उल्लंघन केल्याप्रकरणी केली ही कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

कोलकाता नाइट रायडर्स

कोलकाताला BCCI चा दणका; एका खेळाडूवर केली ही कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शारजाह : विजय मिळविल्यानंतर, शतक झळकावल्यानंतर किंवा विकेट घेतल्यानंतर प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने आनंद व्यक्त करीत असतात. तसेच बाद झाल्यानंतर काही खेळाडू भर मैदानात आपला रागही व्यक्त करीत असतात. राग व्यक्त करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआये कोलकाता खेळाडू दिनेश कार्तिकवर कारवाई केली आहे.

बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघात दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. अंतिम षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाताने विजय मिळवून अंतिम सामन्यात धडक दिली. तत्पूर्वी, फलंदाजी करताना रबाडाच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिक क्लिन बोल्ड झाला. बाद होताच कार्तिकचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने स्टंपला हात मारत पाडला. यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला.

हेही वाचा: चेन्नईची विजयाची वाट कठीण? २०१२ची पुनरावृत्ती होणार!

कार्तिकने लेव्हल एक नियमांच्या उपकलम २.२ चे उल्लंघन केले आहे. आपल्याकडून चूक झाल्याचे कार्तिकने मान्य करीत दंड भरण्यास सहमती दर्शवली आहे. दिल्ली विरुद्ध झालेल्या रोमांचक लढतीत कोलकाताने दिल्लीवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकाता तिसऱ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र झाला. कार्तिकने केलेली चूक गंभीर नसल्याने फायनल सामन्यात तो खेळणार असल्याचे समजते.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दिनेश कार्तिक दोषी आढळला आहे. त्याने आपली चुकही मान्य केली आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई केली आहे. बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करून याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, दिनेश कार्तिकने आयपीएल आचारसंहितेअंतर्गत चूक स्वीकारली आहे.

रागाच्या भरात पाडला स्टम्प

दिनेश कार्तिक दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बाद झाला आणि त्याचा आपल्या रागावर ताबा राहिला नाही. बाद झाल्यावर कार्तिकने मैदानातील एक स्टम्प हाताने रागाच्या भरात पाडला. त्यामुळे कार्तिकवर ही कारवाई करण्यात आली आहे.

loading image
go to top