esakal | IPL FINAL 2021 : चेन्नईची विजयाची वाट कठीण? २०१२ची पुनरावृत्ती होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नईची विजयाची वाट कठीण? २०१२ची पुनरावृत्ती होणार!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मंबई : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अंतिम सामने खेळणाऱ्या संघांपैकी एक संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स होय. आजवर या संघाने आठ अंतिम सामने खेळले असून, तीन वेळा विजय पटकाविला आहे. तर तब्बल पाच वेळा पराभवाचा सामना करावा लागला. यंदा चेन्नई नवव्यांदा अंतिम सामना खळणार आहे. प्रतिस्पर्धी संघ केकेआरने २०१२ मध्ये चेन्नईला पराभूत केले होते, हे विशेष...

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा महामुकाबला १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विजयासाठी चेन्नई सर्वांच्या पसंतीचा संघ असला तरी केकेआरच्या फायनलचा ट्रॅक रेकॉर्ड धोनीची चिंता वाढविणारा आहे. २०१२ मध्ये केकेआरकडून मिळालेला पराभव चेन्नईला आता नक्की आठवत असेल.

चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी आठवेळा अंतिम सामना खेळला आहे. परंतु, विजय फक्त तीनच वेळा मिळविता आला. अशा स्थितीत धोनीसमोर कठीण आव्हान आहे. केकेआरचा फायनलचा रेकॉर्ड चांगला आहे. केकेआरने दोन वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक दिली असून, दोन्ही वेळा विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.

हेही वाचा: ‘मम्मी-पप्पा, सॉरी मी आत्महत्या करतेय’ मुलीने लावला गळफास

केकेआरचा रेकॉर्ड

  • २०१२ - केकेआरने चेन्नईचा अंतिम षटकात पराभव करून विजय पटकावला होता

  • २०१४ - किंग्ज इलेव्हन पंजाबला (आताचा पंजाब किंग्ज) पराभूत करून केकेआर पहिल्यांचा चॅम्पियन बनला होता

चेन्नई सुपर किंग्सचा रेकॉर्ड

  • २००८ - राजस्थान रॉयल्सकडून पराभूत

  • २०१० - मुंबईला पराभूत करून पहिला विजय

  • २०११ - रॉयल चॅलेंजर बंगळूरचा केला पराभव

  • २०१२ - केकेआरकडून पराभूत

  • २०१३ - मुंबई इंडियन्सकडून पहिल्यांदा पराभूत

  • २०१५ - मुंबई इंडियन्सकडून पराभूत

  • २०१८ - सनराईज हैदराबादला केले पराभूत

  • २०१९ - मुंबई इंडियन्सने केला पराभव

loading image
go to top