IPL 2022: मिस्टर परफेक्शनिस्ट बनला रिंकू सिंगचा 'जबरा फॅन'

बॉलिवूड अभिनेता आमिर खानही रिंकू सिंगचा चाहता
aamir khan rinku singh batting fan  video ipl 2022
aamir khan rinku singh batting fan video ipl 2022

आयपीएल 2022 च्या स्टार खेळाडूंपैकी कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंग एक आहे. त्याने चालू हंगामात फक्त सात सामने खेळले आहे. परंतु या काही सामन्यात त्याने चांगलीच कामगिरी केले आहे. रिंकूने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या 15 चेंडूत 40 धावा करत संघाला जवळपास विजय मिळवून दिला होता. त्याची ही खेळी चाहत्यांच्या मनात कायमच घर केलं आहे. आता बॉलिवूड अभिनेता आमिर खानही रिंकू सिंगचा चाहता झाला आहे. (Aamir Khan Rinku Singh Batting Fan Video IPL 2022)

aamir khan rinku singh batting fan  video ipl 2022
मोठी बातमी! रोहित शर्मा खेळणार नाही ? BCCI कडे केली मागणी

आमिर म्हणाला, रिंकूने जबरदस्त खेळी करून दाखवली. त्याने जवळपास सामना जिंकला होता. विजय असो वा पराजय, काही फरक पडत नाही. रिंकू तो मन जिकंल. रिंकू सिंगने आमिर खानच्या या कौतुकासाठी आभार मानले. रिंकू म्हणाली, धन्यवाद माझ्या फलंदाजीबद्दल तुम्हाला असे वाटले.

रिंकू सिंगने आतापर्यंत प्रथम श्रेणीत ३० सामन्यांमध्ये ५ शतके आणि १६ अर्धशतक करत 64.08 सरासरीने 2307 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीमध्ये सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 163 आहे. रिंकूने आतापर्यंत 41 लिस्ट-ए सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 50.50 च्या वेगाने 1414 धावा केल्या आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये रिंकू सिंगच्या नावावर 1 शतक आणि 12 अर्धशतके आहेत.

aamir khan rinku singh batting fan  video ipl 2022
'ही ऐतिहासिक घटना'; मोदींनी वाढवलं थॉमस चॅम्पियन्सचं मनोबल

आयपीएल 2017 च्या लिलावात रिंकू सिंगला किंग्ज इलेव्हन पंजाबने 10 लाख रुपयांना खरेदी केला होता. त्या हंगामात त्याला फक्त एकच सामना खेळावला. आयपीएल 2022 च्या लिलावात रिकू सिंगला केकेआरने 55 लाख रुपयांना करारबद्ध केले होते. रिंकूने आयपीएल 2022 मध्ये सात सामन्यांमध्ये 34.80 च्या सरासरीने 174 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com