इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेला एकमेव खेळाडू रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला आयपीएल ऑल टाईम ग्रेट संघात स्थान मिळालेलं नाही. रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स हैदराबादसाठी खेळाडू म्हणून आणि नंतर मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार म्हणून पाच जेतेपदं नावावर केली आहेत. तरीही त्याला ऑल टाईम संघात स्थान न मिळाल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रोहित मागील काही हंगामात आयपीएलमध्ये संघर्ष करतोय, परंतु त्याने ही लीग नेतृत्व कौशल्यावर गाजवली आहे.