
भारत आणि पाकिस्तान या दोन संघात वाढलेल्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. पण आता दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली आहे. अशात आता ही स्पर्धा पुन्हा सुरू होणार का, झाली तरी कधी होणार आणि काय समस्या समोर असतील, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
८ मे रोजी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आल्यानंतर भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्याच दरम्यान पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धरमशाला येथे सामना सुरू होता. मात्र हा सामना १०.१ षटकानंतर रद्द करण्यात आला होता.
सामना सुरू असतानाच अचानक आधी सामना थांबवण्यात आला आणि त्यानंतर फ्लडलाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर खेळाडू, प्रेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुखरुप स्टेडियमबाहेर काढण्यात आले होते.