BCCI decision to not award points to PBKS or DC : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला येथे सुरू असलेला सामना मध्येच थांबवण्यात आला आणि त्यानंतर लीग स्थगितीचा निर्णय घेतला गेला. पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ प्ले ऑफच्या स्थानासाठी स्पर्धा करत होते आणि धर्मशाला सामना रद्द केल्याने त्यांना प्रत्येकी १-१ गुण मिळायला हवा होता. पण, बीसीसीआयने अजूनही दोन्ही संघांना हे गुण दिलेले नाहीत आणि त्यामुळे या सामन्याचा नेमका निकाल काय? हा प्रश्न पडला आहे.