RCB IPL 2024 : निश्चिंत राहा! AI भाऊनं सांगितलंय आरसीबी IPL Title जिंकणार... फक्त 5 वर्ष वाट पाहा

AI IPL Winners Prediction RCB Can Win IPL Title
AI IPL Winners Prediction RCB Can Win IPL TitleESAKAL

AI IPL Winners Prediction RCB Can Win IPL Title : AI काहीही करू शकते. आता ते पुढील काही वर्षांच्या आयपीएल विजेत्यांचा अंदाज वर्तवत आहे. पण विराट कोहली आणि आरसीबी ही स्पर्धा जिंकतील का, हा मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. कारण आयपीएल सुरू झाल्यापासून आरसीबीला विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे. त्यांना 17 हंगामात एकदाही ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही.

आरसीबी कधी ट्रॉफी जिंकणार हा त्यांच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आता AI अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सने सोडवला आहे. ChatGPT नुसार, RCB त्यांचे पहिले विजेतेपद फक्त 2029 मध्ये जिंकणार आहे, ते अजून पाच वर्षे दूर आहे. पण तोपर्यंत आरसीबीचा दिग्गज विराट अजूनही खेळत असेल का, याचे उत्तर देणे कठीण आहे.

AI IPL Winners Prediction RCB Can Win IPL Title
KKR IPL 2024 : पूजा मला हा हेअर कट पाहिजे... खुद्द शाहरूखच झाला केकेआरच्या या स्टायलिश खेळाडूच्या हेअर स्टाईलचा फॅन

AI भाऊंनी आरसीबी फॅनसाठी खूश खबरी दिली की त्यांचं टेन्शन अजून वाढवलं हे माहिती नाही. कारण आरसीबी पाच वर्षांनी ट्रॉफी जिंकणार म्हणजे पुढेची पाच वर्षे आरसीबी अशाच प्रकारे खराब खेळणार का हा प्रश्न उरतोच.

आरसीबी 2024 च्या हंगामात चांगलाच संघर्ष करताना दिसत आहे. या हंगामात आतापर्यंत त्यांनी 7 पैकी फक्त एक सामना जिंकला आहे. जर त्यांना प्ले ऑफचं स्वप्न पाहायचं असेल तर त्यांना पुढचे जवळपास सर्व सामने जिंकण्याशिवाय पर्याय नाही.

आरसीबीचा स्टार विराट कोहली सध्या ऑरेंज कॅप होल्डर आहे. मात्र त्याच्या धावा संघाच्या विजयासाठी पुरेशा ठरत नाहीयेत. दुसरीकडून त्याला म्हणावी तशी साथ मिळत नाहीये. आरसीबीची खराब गोलंदाजी ही दशकापासूनची डोकेदुखी आहे. यंदाच्या हंगामात देखील त्यांनी आपली परंपरा सोडलेली नाही.

AI IPL Winners Prediction RCB Can Win IPL Title
Pat Cummins: 'आपल्याविरुद्ध जो खेळेल त्याच्या मनात भीतीच...', RCB वरील विजयानंतर SRH कॅप्टन कमिन्स काय म्हणाला ऐका

विराट कोहलीचं भविष्य काय?

विराट कोहली 35 वर्षाचा आहे. तो आरसीबीचा सर्वात यशस्वी आणि सर्वात सातत्यपूर्ण खेळ करणारा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या हंगामात 316 धावा केल्या आहेत. आरसीबी अन् विराट हे इक्वेशन वादातीत आहे.

मात्र आरसीबी लिलावावेळी काही गंभीर चुका करते. स्टार फलंदाजांनी फलंदाजांनी भरलेली आरसीबी चांगले गोलंदाज आपल्या गोटात खेचण्यात मात्र मागं पडते. तसेच ते प्लेईंग 11 निवडताना देखील गोंधळ करतात. त्यामुळेच त्यांना अजूनपर्यंत आयपीएल विजेतेपद पटकावता आलेलं नाही.

(IPL 2024 Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com