IPL 2023: लाखो लोकांच्यासमोर अरिजित सिंग पडला धोनीच्या पाया! कारण काय बॉलीवूडला पडला प्रश्न

Arijit Singh And MS Dhoni | cricket news in marathi
Arijit Singh And MS Dhoni | cricket news in marathi

IPL 2023 Arijit Singh And MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीगचे १६ वे पर्व शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास एक लाख लोकांच्या साक्षीने दणक्यात सुरू झाले. कोरोना निर्बंधानंतर प्रथमच डोळे दीपविणारा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला. 'बॉलिवूड तडका' सोबतीला असल्यामुळे दीड तासांच्या कार्यक्रमामुळे चाहते मंत्रमुग्ध झाले.

उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध गायक अरिजित सिंग, देशातील युवा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी पुष्मा फेम रश्मिका मंधाना आणि बाहुबली फेम तमन्ना भाटिया यांची उपस्थिती होती. मात्र, यादरम्यान अरिजित सिंगने असे काही केले ज्यामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Arijit Singh And MS Dhoni | cricket news in marathi
IPL 2023 GT vs CSK : गतविजेत्या गुजरातची विजयी सुरूवात; चेन्नईची कडवी झुंज मोडून काढत जिंकला सामना

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एमएस धोनी स्टेजवर अरिजित जवळ पोहोचला तेव्हा त्याने धोनीच्या पायांना स्पर्श करून करोडो मने जिंकली. अरिजित सिंग एमएस धोनीच्या पायाला हात लावेल असे कोणालाही वाटले नव्हते पण त्याने तसे केले. यानंतर धोनीनेही अरिजितला उचलून मिठी मारली. त्याच्या या सुंदर हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Arijit Singh And MS Dhoni | cricket news in marathi
IPL 2023: ऋतुराज गायकवाडचे थोडक्यात हुकले शतक! ४ चौकार ९ गगनचुंबी षटकार... ठोकल्या ९२ धावा

दुसरीकडे, जर आपण या सामन्याबद्दल बोललो तर, IPL 2023च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव करून स्पर्धेत विजयी सुरुवात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावून 178 धावा केल्या होत्या, मात्र गुजरात संघाने 19.2 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com