Arjun Tendulkar: कोणी घ्यायलाच नाही आलं? विमानतळाबाहेर कट्ट्यावर बसून वाट बघताना दिसला अर्जुन; Video व्हायरल

Arjun Tendulkar Viral Video: मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२५ स्पर्धेतील आव्हान संपले. त्यानंतर विमानतळाबाहेर कट्ट्यावर बसून अर्जुन तेंडुलकर वाट पाहातानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Arjun Tendulkar
Arjun TendulkarSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सने पराभवाचा धक्का दिला. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे यंदा तरी ६ व्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

मुंबई इंडियन्सचे या पराभवासह या स्पर्धेतील आव्हान संपल्याने सोमवारी खेळाडू आपापल्या घरी परतले. दरम्यान, परत जाताना खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. यादरम्यानचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. यामध्ये अर्जुन तेंडुलकरच्या व्हिडिओची सध्या चर्चा आहे.

Arjun Tendulkar
Arjun Tendulkar: उद्याचा दिग्गज! झहीर खानसोबतच्या 'त्या' व्हिडिओवर अर्जुनला मिळाला नवा टॅग; आधी योगराज यांनी म्हटलेलं पुढचा गेल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com