अर्शदीप सिंग पुन्हा वादात अडकला! तिलक वर्मावर वर्णद्वेषी टिप्पणी, नेटकरी खवळले

Arshdeep Singh Allegedly Makes Racist Comment: पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग तिलक वर्मावर कथित वर्णद्वेषी टिप्पणी केल्याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत; मुंबई इंडियन्सचा विजय तिलक वर्माच्या दमदार खेळीमुळे.
Arshdeep Singh Allegedly Makes Racist Comment

Arshdeep Singh Allegedly Makes Racist Comment

esakal

Updated on

Arshdeep Singh Allegedly Makes Racist Comment: पंजाब किंग्सचा(PBKS) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मावर(Tilak Varma) केलेल्या कथित वर्णद्वेषी टिप्पणीमुळे त्याला सोशल मीडियावर जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग हा मुंबईच्या तिलक वर्मावर टिप्पणी करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काल झालेल्या पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाबला ६ गडी राखून पराभूत केले. या पराभवानंतर पंजाबचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com