IPL 2024 : बुमराला षटकार मारण्याचे स्वप्न झाले पूर्ण ! आशुतोष शर्माने या व्यक्तीला दिले क्रेडिट..

विख्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला स्वीपचा षटकार मारण्याचे माझे स्वप्न होते.
IPL 2024
IPL 2024 sakal

मुल्लानपूर (पंजाब) : विख्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला स्वीपचा षटकार मारण्याचे माझे स्वप्न होते. ते मी पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे, असे मत पंजाब किंग्स संघाचा नवोदित धडाकेबाज फलंदाज आशुतोष शर्मा याने व्यक्त केले.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कमालीचा चढ-उतार असलेला होता. १९३ धावांचे आव्हान दिल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबची अवस्था ७ बाद १११ अशी केली होती; परंतु त्यानंतर आशुतोष शर्माच्या फलंदाजीचे वादळ आले आणि मुंबईच्या गोलंदाजांच्या तोंडी फेस आला होता. त्याने २८ चेंडूत २ चौकार आणि सात षटकारांसह ६१ धावांची खेळी साकार केली. यातील एक स्वीपचा षटकार त्याने बुमराला मारला.

१३ व्या षटकात बुमराने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु तो चेंडू फुलटॉस झाला आणि ही संधी साधून आशुतोषने स्क्वेअर लेगला षटकार मारला. ४ षटकांत ३१ धावांत ३ बळी मिळवून पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणाऱ्या बुमराच्या गोलंदाजीवर सामन्यातील हा एकमेव षटकार मारण्यात आला. बुमराला स्वीपचा षटकार मारण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी भरपूर सरावही केला होता. तो क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम गोलंदाज आहे; परंतु अशा गोलंदाजांविरुद्ध अशा प्रकारे फटका मारणे हा खेळाचाच भाग असतो, असे आशुतोष म्हणाला.

हा सामना आपण संघाला जिंकून देऊ शकतो, असा विश्वास होता, असे आशुतोषने सांगितले. बुमराच्या तिसऱ्या षटकात त्याने हा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांतर आव्हान आवाक्यात आल्यानंतर बुमराच्या चौथ्या आणि अखेरच्या षटकात त्याने सावध फलंदाजी केली; मात्र कोएत्झीच्या पुढच्या षटकात उंच फटका मारण्याच्या प्रयत्नाने त्याने विकेट गमावली.

आशुतोषने आपल्या या फलंदाजीचे श्रेय पंजाब संघ व्यवस्थापनाचे प्रमुख संजय बांगर यांना दिले. मी स्लॉग फटकेबाजी करणारा फलंदाज नाही, तर मी तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा फलंदाज आहे, एवढा एकच सल्ला बांगर यांनी मला दिला होता. त्यामुळे मी कोणतेही आडवेतिडवे फटके मारण्याऐवजी तंत्रशुद्ध फटके मारण्यावर भर दिला आणि त्यामुळे फरक पडला, असे आशुतोषने सांगितले.

मी मूळचा मध्य प्रदेशचा खेळाडू आहे. तेथे मला माजी रणजीपटू आणि प्रशिक्षक अमेय खुरासिया यांचे मार्गदर्शन मिळते. जेवढा तू जास्त खेळपट्टीवर राहशील, तेवढी तुझ्या संघाला विजयाची अधिक संधी असेल, असे ते मला वारंवार सांगत असतात, असेही खुरासियांबद्दल आशुतोष म्हणाला.

संजय बांगर मला जास्तीत जास्त संधी देण्यासाठी आग्रही असतात. आमच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रॅव्हर बायलिस, कर्णधार शिखर धवन यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचा असते. विजय-पराभव हा खेळाचा भाग असतो; पण तुम्ही संघासाठी कसे खेळता हे महत्वाचे असते, असेही मत आशुतोषने व्यक्त केले. पंजाबचे सात सामने झाले असून त्यांच्या सहा सामन्यांचे निकाल अखेरच्या षटकांत लागले आहेत. गुरुवारी झालेला मुंबईविरुद्धचा सामना त्यास अपवाद नव्हता.

IPL 2024
IPL 2024 : धोनी की कार्तिक... स्लॉग ओव्हरमध्ये कुणाचं स्ट्राईक रेट आहे जबरदस्त?

पंजाब आणि अखेरचे षटक

  • - दिल्लीविरुद्ध अखेरच्या षटकात विजय

  • - बंगळूरविरुद्ध अखेरच्या षटकात पराभव

  • - गुजरातविरुद्ध अखेरच्या षटकात विजय

  • - हैदराबादविरुद्ध अखेरच्या षटकात हार

  • - राजस्थानविरुद्ध अखेरच्या षटकात पराभव

  • - मुंबईविरुद्ध अखेरच्या षटकात हार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com