Asia Cup 2023 : आशिया कप खरोखरच होणार रद्द? ACC ने केला मोठा खुलासा

Asia Cup 2023
Asia Cup 2023

Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे, मात्र भारत सरकार सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर संघ पाठवण्यास तयार नाही.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले आहे. सोमवारी सकाळपासून या बातम्या सतत येत होत्या की आशिया कप 2023 देखील रद्द होऊ शकतो. मात्र आता खुद्द आशियाई क्रिकेट परिषदेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Asia Cup 2023
RCB विरुद्धच्या LIVE सामन्यात लखनौचा बदलला कर्णधार! राहुलसोबत घडली मोठी घटना, रडत रडत मैदानाबाहेर

एसीसीच्या सूत्रांनी आशिया चषक पुढे ढकलण्याबाबत मीडिया वृत्तांचे खंडन केले आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळण्यास सहमत नसेल, तर देश स्पर्धेचे यजमानपद काढून घेऊ शकतो. PCB ने आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी एक 'हायब्रीड मॉडेल' प्रस्तावित केले आहे जेथे पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर खेळेल तर भारत तटस्थ ठिकाणी खेळेल.

2018 आणि 2022 प्रमाणे संपूर्ण स्पर्धा दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे तीन मैदानांसह यूएईमध्ये खेळवण्याची बीसीसीआयची इच्छा असल्याचे कळत आहे. भारत आशिया कप 2018 चे यजमान होते तर श्रीलंका 2022 स्पर्धेचे यजमान होते.

Asia Cup 2023
टीम इंडियातून बाहेर... लिलावात अनसोल्ड... IPL मध्ये केली मराठी कॉमेंट्री... पण अखेर 'तो' परतला

दुबईतील आयसीसीच्या बैठकीच्या वेळी झालेल्या चर्चेची माहिती असलेल्या एसीसी बोर्ड सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की आमचे एकमेकांवर बोलणं झाले परंतु आशिया चषक पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा प्रस्ताव करण्यात आलेला नाही.

दुसरे म्हणजे आशिया चषक रद्द झाल्यास प्रथम पीसीबीला कळवले जाईल, असे सूत्राने सांगितले. आतापर्यंत असे काहीही घडलेले नाही. ACC अध्यक्ष शाह यांनी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही.

जय शाह म्हणाले की, स्पर्धा पुढे ढकलायची की रद्द करायची याचा निर्णय घेण्यासाठी एसीसीला कार्यकारी मंडळाची बैठक बोलावावी लागेल. आतापर्यंत अशा कोणत्याही बैठकीची माहिती देण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com