
दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलच्या नेतृत्वात शनिवारी (५ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवला. दिल्लीने चेन्नईच्या घरच्या मैदानात चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात २५ धावांनी विजय मिळवला.
हा दिल्लीचा सलग तिसरा विजय आहे. दिल्ली अद्याप अपराजित आहेत. तसेच चेन्नईला मात्र सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या यशानंतर अक्षर पटेलने प्रतिक्रिया दिली आहे.