
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५० वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात जयपूरमध्ये पार पडला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला.
यामुळे मुंबईने आता प्लेऑफसाठी प्रबळ दावेदारी ठोकली आहे. मात्र राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपले आहे. मु्ंबईच्या विजयात फलंदाजांसह गोलंदाजांचेही महत्त्वाचे योगदान राहिले. मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मानेही अर्धशतकी खेळी करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.