Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध २१७ धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्मा व रायन रिकेल्टनच्या अर्धशतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीने RR च्या गोलंदाजांना हैराण केले. रोहित-रायनने पहिल्या विकेटसाठी ११६ धावा जोडल्या, तर सूर्या-हार्दिकने नाबाद ९४ धावांची भागीदारी केली. सूर्याने आजच्या सामन्यात नेहमीप्रमाणे इनोव्हेटिव्ह फटके मारले अन् आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.