Shikhar Dhawan Complete 6000 Runs In IPL
Shikhar Dhawan Complete 6000 Runs In IPL ESAKAL

PBKS vs CSK : शिखर धवनचा सीएसके विरूद्ध तिहेरी धमाका

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) 38 व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज (Punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात लढत होत आहे. पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनसाठी (Shikhar Dhawan) आजचा सामना खूप खास आहे. त्याचा हा आयपीएलमधील 200 वा सामना असून आपल्या 200 व्या सामन्यात (200th IPL Match) आपल्या सहा हजार धावा पूर्ण केल्या.

Shikhar Dhawan Complete 6000 Runs In IPL
डेव्हिड कॉनव्हॉयने बांधली लग्नगाठ; CSK ने शेअर केला खास फोटो

शिखर धवनने सीएसकेच्या तिक्षाणाच्या चेंडूवर आपली तिसरी धाव पूर्ण करत आयपीएलमधील 6000 धावा पूर्ण (6000 IPL Runs) केल्या. आयपीएल इतिहासात 6000 धावा पूर्ण करणारा शिखर धवन हा विराट कोहलीनंतरचा दुसरचा फलंदाज ठरला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली (6402) पहिल्या स्थानावर आहे. तर त्याच्या खालोखाल शिखर धवनचा नंबर लागतो. त्याने आजच्या सामन्यात 6000 धावांचा टप्पा पार केला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर 5764 धावा करून रोहित शर्मा विराजमान आहे.

शिखर धवन आजच्या सामन्यात एवढ्यावरच थांबला नाही. आजच्या सामन्यात 11 धावा करताच शिखरने टी 20 मधील 9 हजाराची मनसबदारी (9000 T20 Runs) देखील मिळवली. याचबरोबर भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शिखर धवन तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली (10392) पहिल्या आणि रोहित शर्मा (10048) दुसऱ्या स्थानावर आहे.

Shikhar Dhawan Complete 6000 Runs In IPL
'15 कोटींची काय गरज होती, 50 रुपयांत चांगला ओपनर मिळाला असता'

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. मात्र पंजाबने आजच्या सामन्यात तीन बदल केले. शाहरूख खान, वैभव अरोरा आणि नॅथन अॅलिस यांनी वगळण्यात आले असून त्यांच्या जागी संदीप शर्मा, ऋषी धवन आणि भानुका राजपक्षा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com