
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गेल्या काही दिवसांपासून फलंदाजांच्या बॅट चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकतेच रविवारी (१३ एप्रिल) झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यादरम्यान खेळाडूंच्या मैदानातच बॅट तपासण्यात आल्या होत्या.
त्यानंतर आता मंगळवारी (१५ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या सामन्यातही खेळाडूंच्या बॅट तपासण्यात आल्या. या तपासात कोलकाताच्या दोन खेळाडूंच्या बॅट नियमात बसत नसल्याचे स्पष्ट झाले.