RP Singh questions KKR’s batting depth : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफची शर्यत आता रंगतदार बनली आहे. गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ प्रत्येकी १२ गुणांसह आघाडीवर आहेत, परंतु तरीही त्यांचे प्ले ऑफचे स्थान पक्के नाही. आज पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. PBKS १० गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे, तर KKR ६ गुणांसह सातवा आहे. त्यामुळे आजचा सामना कोलकातासाठी महत्त्वाचा आहे. पण, या सामन्यापूर्वी भारताचा व RCB चा माजी खेळाडू आर पी सिंग ( RP Singh) याने कोलकाताला ट्रोल केले आहे.