Punjab Kings star ruled out with finger fracture
पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये काल चेन्नई सुपर किंग्सला चेपॉकवर पराभूत केले आणि गुणतालिकेत १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. युझवेंद्र चहलच्या हॅटट्रिक अन् प्रभसिमरन सिंग व श्रेयस अय्यरच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने हा विजय मिळवला. आता पंजाबला उर्वरित ४ सामन्यांत दोन विजय पुरेसे आहेत. प्ले ऑफच्या जवळ पोहोचले असताना त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडूने बोटाला फ्रँक्चर झाल्यामुळे आयपीएल २०२५ मधून माघार घेतली आहे.