Delhi Capitals face backlash for signing Bangladesh pacer
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ला १७ मेपासून पुन्हा सुरूवात होतेय आणि दोन दिवसावर स्पर्धा आली असताना सोशल मीडियावर #BoycottDelhiCapitals हा ट्रेंड सुरू झाला आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित केली गेली होती. पण, आता ती पुन्हा शनिवारपासून सुरू होणार आहे. त्याला कारण बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान हा आहे. आयपीएल २०२५ च्या या पर्वात १६ बांगलादेशी खेळाडूंनी नावं नोंदवली होती, परंतु त्यापैकी एकावरही बोली लागली नाही.