Operation Sindoor नंतर देशातील सीमालगतच्या विमानतळ बंद करण्यात आल्या आहेत. चंदीगढ विमानतळ १० मे पर्यंत बंद असल्याने मुंबई इंडियन्सला तिथे पोहोचणे अवघड झाले होते. अशात हा सामना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
IPL 2025 मधील ११ मे रोजी होणारा पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( PBKS vs MI) यांच्यातील सामना धर्मशाला येथे होणार होता, मात्र तो आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.