
धोनीच्या हातात CSK चे भवितव्य; आत्मसन्मानाविरुद्ध प्रतिष्ठेची लढाई
IPL 2022: अखेरचे चार साखळी सामने शिल्लक असण्यापूर्वीच आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सला आता उर्वरित सामन्यात आत्मसन्मानासाठी लढावे लागणार आहे; तर आज त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफासाठीच्या अंधुक आशा कायम ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणास लावणार आहे.(MS Dhoni vs Rohit Sharma IPL Match CSK vs MI)
हेही वाचा: 'लिंबू मिरची कुठे आहे' राजस्थान रॉयल्सच्या त्या ट्विटची चर्चा
सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई आणि चेन्नई यांच्यातील लढत आयपीएलमधील `एल क्लासिको` समजली जाते. या दोन संघांत झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात धोनीने कमाल केली होती. अखेरच्या चेंडूवर षटकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे जय-पराजयाचा फारसा परिणाम गुणतक्त्यावर होणार नसला तरी मुंबई-चेन्नई सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरू शकेल.
महेंद्रसिंग धोनी पुन्हा नेतृत्व करत असलेला चेन्नईचा संघ आज जिंकला तर त्यांच्या आशा कायम राहातील, अन्यथा मुंबईप्रमाणे त्यांचेही आव्हान साखळी सामने पूर्ण होण्याच्या अगोदरच संपुष्टात येईल. कठीण परिस्थितीतून संघाला उभारी देण्याची धोनीची खासियत आहे. त्यातच अगोदरच्या सामन्यात तादकवर दिल्लीचा ९१ धावांनी धुव्वा उडवल्यामुळे चेन्नईला वेगळाच आत्मविश्वास सापडला आहे.
हेही वाचा: ज्योतीचा हर्डल्समध्ये विक्रम; अनुराधाचा २० वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा
रवींद्र जडेजावर लक्ष
अचानक मिळालेल्या कर्णधारपदाचे ओझे रवींद्र जडेजा सहन करू शकला नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतीमुळे खेळला नव्हता, आता आजच्या सामन्यात तो खेळणार की नाही हे स्पष्ट करण्यात आले नाही.
बदल अपेक्षित
संघ कायम ठेवण्यावर मुंबई संघाचा एरवी भर असतो, पण आता जय-पराजयाचे महत्त्व नसल्यामुळे राखीव खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Web Title: Chennai Super Kings And Mumbai Indians Ms Dhoni Vs Rohit Sharma Ipl Match Csk Vs Mi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..