
'लिंबू मिरची कुठे आहे' राजस्थान रॉयल्सच्या त्या ट्विटची चर्चा
आयपीएलच्या 15 व्या हंगामातला 58 सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बुधवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहे. दिल्लीच्या या विजयात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 144 धावांची शानदार भागीदारी करत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. डेव्हिड वॉर्नरने राजस्थानविरुद्ध 52 धावांची नाबाद इनिंग खेळली, त्यादरम्यान एक विचित्र अशी घटना घडली. डेव्हिड वॉर्नरच्या खेळीदरम्यान युझवेंद्र चहलचा एक चेंडू थेट विकेटवर गेला, तरीही तो नाबाद होता. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(David Warner Not Out After Yuzvendra Chahal Ball Hit The Wicket)
हेही वाचा: DC vs RR : ऑस्ट्रेलियन जोडी ठरली राजस्थानसाठी कर्दनकाळ
युजवेंद्र चहल दिल्लीच्या डावातील 9वे षटक करत होता. चहलने पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर वॉर्नरला लेगब्रेक चेंडू टाकला. वॉर्नरचा चेंडू खेळताना हुकला आणि चेंडू थेट विकेटवर गेला, पण बेल्स पडले नाहीत, त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला नाबाद देण्यात आले. या घटनेनंतर गोलंदाज युजवेंद्र चहलची प्रतिक्रिया देखील पाहण्यासारखी होती, कारण तो पूर्णपणे धक्कादायक दिसत होता. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नशिबाने साथ दिली. या घटनेपूर्वी युझवेंद्र चहलच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा एक झेलही सुटला होता. या सामन्यातील डेव्हिड वॉर्नरचे हे नशीब पाहून राजस्थान रॉयल्सनेही गंमतीत ट्विट केले आहे. राजस्थान रॉयल्सने डेव्हिड वॉर्नर आणि चहलचा एक फोटो शेअर केला, ज्याचे कॅप्शन लिहिले 'लिंबू मिरची कुठे आहे'.
हेही वाचा: डेव्हिड वॉर्नर आऊट होऊनही नाबाद; चाहत्यांना बसला धक्का!
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरआरकडून अश्विनने अर्धशतक झळकावले, तर पडिक्कलने 48 धावा केल्या. दिल्लीने हे लक्ष्य 11 चेंडू राखून पूर्ण केले. मार्शने 89 आणि वॉर्नरने नाबाद 52 धावा केल्या.
Web Title: David Warner Remains Not Out After Yuzvendra Chahal Ball Hit The Wicket In Dc Vs Rr Match Ipl 2022 Watch Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..