
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा अद्यापती पाचवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्ससाठी फारसे चांगले राहिलेले नाही. त्यांना ८ सामन्यांपैकी फक्त दोन सामनेच अद्याप जिंकता आले आहेत. नेट रन रेटही चेन्नईचा सर्वात कमी आहे. त्यामुळे चेन्नई सध्या पाँइंट्स टेबलमध्येही १० व्या क्रमांकावर आहेत.
चेन्नईचे आता ६ साखळी सामने आता बाकी आहेत. जर चेन्नईला आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवायचे असेल, तर त्यांना उर्वरित सर्व ६ सामने जिंकावे लागणार आहेत. चेन्नईचा नववा सामना घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शुक्रवारी (२५ एप्रिल) होणार आहे.
हैदराबादने अद्याप कधीही चेपॉकवर विजय मिळवलेला नाही. त्यामुळे चेन्नई हैदराबादविरुद्ध हाच इतिहास कायम करण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. दरम्यान, या सामन्यापूर्वी चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठं भाष्य केले आहे.