
MI vs CSK : रोहितने वाढदिवसादिवशीच पोलार्डला वगळले
मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना आज ( दि. 12 ) वानखेडे स्टेडियमवर होत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने आजच्या सामन्यासाठी संघात एक बदल केला. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज आणि बर्थडे बॉय (Birthday Boy) कायरॉन पोलार्डलाच (Kieron Pollard) मुंबईने वगळले. त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्स ( Tristan Stubbs) मुंबईकडून आयपीएल पदार्पण करणार आहे.
हेही वाचा: हार्दिक पांड्या स्वार्थी, GT ला टाकले अडचणीत; माजी क्रिकेटपटूचा आरोप
आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी फारसा चांगला गेलेला नाही. त्यांचे रथी महारथी यंदाच्या हंगामात फेल गेले. मुंबईने हार्दिक पांड्याला डावलून कायरॉन पोलार्डला रिटेन केले होते. मात्र यंदाच्या हंगामात पोलार्डची बॅट काही केल्या चालली नाही. चांगल्या स्ट्राईक रेटने सोडा बॉल टू रन देखील करताना पोलार्ड चाचपडत होता. दरम्यान, आज 12 मे ला पोलार्डचा वाढदिवस असतो. त्याच दिवशी त्याला मुंबईने संघातून वगळले.
हेही वाचा: शाहरूखच्या नाईट रायडर्सने अबू धाबीमधील फ्रेंचायजी घेतली विकत
दरम्यान, दोन्ही संघांचे गुण पाहिले तर त्यांच्या प्ले ऑफच्या आशा खूपच मंदावल्या आहेत. मात्र असे असले तरी या दोन संघात होणाऱ्या सामन्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. यंदाच्या हंगामात मुंबई आणि चेन्नई दुसऱ्यांदा भिडणार आहेत. 21 एप्रिलला झालेल्या सामन्यात चेन्नईने शेवटच्या षटकात मुंबईचा तीन विकेट राखून पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मुंबईला आज संधी आहे.
Web Title: Mumbai Indians Dropped Birthday Boy Kieron Pollard Against Chennai Super Kings
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..