CSK Reached In Final : चेन्नईचे पाचवे विजेतेपद दृष्टीपथात; गुजरातच्या पराभवाने मुंबईचे ठोके वाढले

CSK Reached In Final
CSK Reached In Final esakal

CSK Reached In Final : चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 173 धावांचे आव्हान पार करताना गुजरातला 20 षटकात सर्वबाद 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईने 15 धावांनी सामना जिंकत फायनल गाठली. गुजरातकडून शुभमन गिल (42) आणि राशिद खानने (30) झुंजार खेळी केली. मात्र धोनीची कॅप्टन्सी अन् चेन्नईच्या पोरांची दमदार गोलंदाजी याच्या जोरावर चेन्नईने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची फायनल गाठली. चेन्नईकडून दीपक चाहर, रविंद्र जडेजा आणि महीश तिक्षाणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

CSK Reached In Final
CSK vs GT Qualifier 1 Live : चेन्नईने गाठली फायलन, गुजरातचा केला 15 धावांनी पराभव

चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सची सुरूवात खराब झाली. वृद्धीमान साहा 12 धावांवर तर कर्णधार हार्दिक पांड्या 8 धावांची भर घालून माघारी परतला. गुजरातची अवस्था 6 षटकात 2 बाद 45 अशी झाली. दरम्यान, सलामीवीर शुभमन गिलने गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरातला 10 षटकात 72 धावांपर्यंत पोहचवले. मात्र दुसऱ्या बाजूने 16 चेंडूत 17 धावा करणाऱ्या दसुन शानकाला रविंद्र जडेजाने बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला.

CSK Reached In Final
GT vs CSK IPL Qualifier 1 : स्कोअरबोर्डवरील डॉट बॉलच्या जागी झाडं दाखवण्यांच काय आहे गौडबंगाल?

यानंतर गुजरातची मधली फळी ढेपाळली. डॅशिंग डेव्हिड मिलर 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपक चाहरने झुंजार शुभमन गिलची 38 चेंडूत केलेली 42 धावांची खेळी देखील संपुष्टात आली. राहुल तेवतिया 3 धावा करून तिक्षाणाची शिकार झाला. गुजरातने शंभरच्या आत 6 फलंदाज गमावल्यानंतर चेन्नईची सामन्यावर पकड मजबूत झाली असे वाटत होते.

मात्र सातव्या विकेटसाठी राशिद खान आणि इम्पॅक्ट प्लेअर विजय शंकर यांनी आक्रमक 38 धावांची भागीदारी रचत सामन्यात जोरदार पुनरागमन केले. मात्र मथिशा पथिरानाने ए विजय शंकरला 14 धावांवर बाद केले. यात षटकात दर्शन नाळकांडे शुन्यावर धाबाद झाला. आता चेन्नईचा विजय दृष्टीपथात दिसत होता.

CSK Reached In Final
CSK vs GT : मोहित - मोहम्मदचा प्रभावी मारा; चेन्नईचे मधल्या फळीतील शेर झाले ढेर

मात्र चेन्नईच्या विजयामध्ये राशिद खान उभा होता. त्याने 16 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. तो असेपर्यंत चेन्नईचे टेन्शन कमी झाले नव्हते. अखेर 19 व्या षटकात ज्या तुषार देशपांडेला राशिदने चोपले त्यात तुषारने त्याचा अडसर दूर केला. या विकेटबरोबरच चेन्नईचा विजय जवळपास निश्चित झाला. अखेर पथिरानाने मोहम्मद शमीला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 5 धावांवर बाद करत सामना 15 धावांनी जिंकून दिला.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com