IPL 2024 kkr : प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची संघात लष्करी शिस्त ; कोलकता नाईट रायडर्स संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेव्हिस विसची टीका

चंद्रकांत पंडित यांची प्रशिक्षणाची पद्धत ‘लष्करी’ पद्धतीसारखी आहे. त्यामुळे कोलकता संघातील अनेक परदेशी खेळाडू त्यांच्यावर नाराज आहेत, असे मत त्यांच्या संघातील माजी खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकन असलेल्या डेव्हिड विस याने व्यक्त केले
IPL 2024
IPL 2024sakal

नवी दिल्ली : चंद्रकांत पंडित यांची प्रशिक्षणाची पद्धत ‘लष्करी’ पद्धतीसारखी आहे. त्यामुळे कोलकता संघातील अनेक परदेशी खेळाडू त्यांच्यावर नाराज आहेत, असे मत त्यांच्या संघातील माजी खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकन असलेल्या डेव्हिड विस याने व्यक्त केले.

गत आयपीएल मोसमात ३८ वर्षीय अष्टपैलू असलेला डेव्हिड विस केवळ तीन सामने खेळला होता. चंद्रकांत पंडित यांची शिस्त लष्कराप्रमाणे आहे, खेळाडूंनी कसे वागावे, कोणते कपडे घालावेत, असा त्यांचा आदेश असायचा. त्यामुळे परदेशी खेळाडू फार नाराज असायचे, असे विस याने सांगितले.

तो पुढे म्हणतो, अतिशय करडी शिस्त लावण्याचा पंडित यांचा हट्ट असायचा. हे फ्रँचाईस क्रिकेट आहे. परदेशी खेळाडू जे विविध देशांत खेळत असतात, अशा खेळाडूंना कोणी कसे वागावे, कोणते कपडे परिधान करावेत, दिवसभर काय करावे, असे सांगणे योग्य नाही.

IPL 2024
IPL 2024 kkr vs rcb : विराटविरुद्ध स्टार्क आजचे आकर्षण ; बंगळूर आणि कोलकतामधील लढत रंगतदार होण्याची अपेक्षा

मूळ मुंबईकर असलेले चंद्रकांत पंडित यांची २०२२ मध्ये कोलकता संघाचा प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सध्याचे ते यशस्वी प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भने २०१८, २०१९ मध्ये; तर मध्य प्रदेशने २०२२ मध्ये रणजी विजेतेपद मिळवले आहे.

म्हणूनच शाहरुख खान यांच्या कोलकता संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. मूळचा दक्षिण आफ्रिकन असलेल्या विस याने नामिबिया संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. २०२२ मधील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत तो नामिबिया संघातून खेळला होता. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास आपण आनंदी नव्हतो, असाही उल्लेख त्याने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com