IPL 2024 Ruturaj Gaikwad : प्रशिक्षक हसी यांच्याकडून ऋतुराजच्या फलंदाजीचे कौतुक

चेन्नई सुपरकिंग्सने रविवारच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. या लढतीत कर्णधार ऋतुराज गायकवाड याने ९८ धावांची खेळी साकारत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
IPL 2024 Ruturaj Gaikwad
IPL 2024 Ruturaj Gaikwad sakal

चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्सने रविवारच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. या लढतीत कर्णधार ऋतुराज गायकवाड याने ९८ धावांची खेळी साकारत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याच पार्श्वभूमीवर चेन्नई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनी ऋतुराजच्या फलंदाजीचे कौतुक करताना म्हटले की, ऋतुराज हा बहुतांशी वेळा गोलंदाजांच्या एक पाऊल पुढे असतो.

मायकेल हसी पुढे नमूद करतात की, ऋतुराज हा अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू आहे. तो फलंदाजी करताना चेंडू मोकळ्या जागेत छानपैकी टोलवतो. चेंडूला मोकळ्या जागेत (गॅप) दिशा देण्याचे काम तू कसे काय साध्य करतोस, असा प्रश्‍न मी त्याला विचारतो. ऋतुराज हा हुशार खेळाडूही आहे. केव्हा आक्रमक फलंदाजी करायची आणि दबावाखाली कसा खेळ करायचा हे त्याला चांगलेच माहीत आहे. तो फिरकी गोलंदाजांसमोरही छान खेळतो. तसेच वेगवान गोलंदाजांचाही समर्थपणे मुकाबला करतो. मैदानाच्या सर्व बाजूंकडून तो धावा करू शकतो. ऋतुराज आमच्या संघात आहे ही महत्त्वाची बाब आहे, असे हसी पुढे आवर्जून सांगतात.

तीन वर्षांमध्ये एक करंडक पटकावायचाय - गॅरी कर्स्टन

कराची : भारतीय संघाला २०११मध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन यांची पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय व टी-२० संघांना ते मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी त्यांनी एक ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. त्यापैकी किमान एक स्पर्धा जिंकण्याचा ध्यास बाळगला आहे.

IPL 2024 Ruturaj Gaikwad
IPL 2024 KKR vs DC : कोलकत्याचा दिल्लीवर शानदार विजय ; वरुण चक्रवर्ती अन् फिल सॉल्ट प्रभावी

यंदा वेस्ट इंडीजमध्ये टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२५मध्ये चॅम्पियन्स करंडक खेळवला जाणार आहे. त्यानंतर २०२६मध्ये भारतामध्ये टी-२० विश्‍वकरंडकाचा थरार रंगणार आहे. याबाबत गॅरी कर्स्टन सांगतात, पुढील तीन वर्षांमध्ये तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. या तीन स्पर्धांपैकी एका स्पर्धेतही जेतेपद पटकावता आल्यास आनंद होईल. सध्या पाकिस्तानचा संघ कुठल्या परिस्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी काय करायला हवे, जेणेकरून आयसीसी स्पर्धा जिंकता येईल, याकडे लक्ष देणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com