

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला आता १० दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला असल्याने संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. अनेक संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सचा संघातही खेळाडू सहभागी होत असून अनेक खेळाडूंच्या सरावालाही सुरुवात झाली. अशात संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही संघात परतला आहे.