esakal | Viral Video: इशान किशनची ड्रेसिंग रूममध्ये सुरू होती हिरोगिरी अन् तितक्यात... | Ishan Kishan
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video: इशान किशनची सुरू होती हिरोपंती अन् तितक्यात...

त्याची फजिती झालेली पाहून पोलार्डलाही हसू आवरलं नाही

Viral Video: इशान किशनची सुरू होती हिरोपंती अन् तितक्यात...

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs DC: मुंबई इंडियन्स संघाचा सामना दिल्लीशी होणार आहे. दिल्लीचा संघ आधीच प्ले ऑफ्समध्ये पोहोचला आहे. पण मुंबईला पुढील सर्वच्या सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे. या दरम्यान मुंबई इंडियन्स संघाच्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज इशान किशन याच्या प्रतिक्रियेची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: IPL 2021: मुंबईला 'दिल्ली' जिंकावीच लागेल! पाहा आकडेवारी

मुंबईचा इशान किशन आणि इतर खेळाडू मैदानातील आपला सराव पूर्ण करून ड्रेसिंग रूममध्ये आले. त्यावेळी इशान किशनदेखील त्यांच्यासोबत होता. इशान किशनने जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या डोळ्यावर काळा गॉगल होता. कानात आयपॉड्स होते. झकासपैकी हिरोपंती करत तो ड्रेसिंग रूममध्ये आला होता. पण ज्या क्षणी त्याने खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला ड्रेसिंग रूममध्ये पाहिलं त्यानंतर त्याची हिरोपंती हवेत विरली. लगेच गॉगल काढून आणि आयपॉड्स काढून त्याने सचिनला अभिवादन केलं. 'गुड अफ्टरनून सर' असं बावचळलेल्या अवस्थेत तो म्हणाला. त्याची अशी फजिती झालेली पाहून पोलार्डलाही हसू आवरलं नाही.

हेही वाचा: Video: पूनम राऊतने फटका खेळताच झालं जोरदार अपील अन् पुढे...

पाहा व्हायरल झालेला Video-

loading image
go to top