
मंगळवारी (३ जून) १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं स्वप्न सत्यात उतरलं. रजत पाटिदारच्या नेतृत्वात बंगळुरूने आयपीएल २०२५ पर्वाची ट्रॉफी उंचावली. संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक बंगळुरूने मारली होती.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले. बंगळुरूच्या या विजयानंतर जगभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अनेक आजी - माजी क्रिकेटपटूंनी, तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनीही बंगळुरूचे कौतुक केले आहे.