
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी(३ जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. अहमदाबादला झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या रुपात आयपीएलला नवा विजेता मिळाला आहे. मात्र पंजाब किंग्स संघाला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.