
भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ४३ वर्षीय धोनीने २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण तो अद्यापही आयपीएलमध्ये सक्रिय आहे.
याचदरम्यान आंयपीएल २०२५ स्पर्धेत शनिवारी (५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यावेळी चॅपॉक स्टेडियमवर धोनीने आई-वडील पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी हजर होते. त्यामुळे त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीबद्दलही चर्चांना उधाण आले होते. तथापि, आता एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल केलेलं भाष्य आता समोर आले आहे.