
संपूर्ण आयपीएलमध्ये आमचा खेळ लौकिकास साजेसा नव्हता. त्यामुळे तळाच्या स्थानावर राहायला लागले याचे दुःख नाही, परंतु नव्या उमेदीने आम्ही पुनरागमन करू, असा विश्वास चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केला.
आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा संघ म्हणून चेन्नईकडे पाहिले जाते. त्यात त्यांनी पाच विजेतेपद मिळवल्यामुळे या संघाचा नेहमीच प्रभाव राहिलेला आहे, मात्र मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थानकडून पराभव झाला परिणामी त्यांना यंदा अखेरच्या स्थानावरच राहावे लागणार, हे निश्चित झाले आहे.