
चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल २०२५ हंगाम खास राहिलेला नाही. पाचवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स यंदा प्लेऑफच्या शर्यतीमधून सर्वात आधी बाहेर झाले. पण असे असले तरी त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट घडली, ती त्यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागेवर संघात घेतलेले युवा बदली खेळाडू.
आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस, उर्विल पटेल या सर्वांनीच आपलं नाणं चेन्नईकडून पदार्पण करताना खणखणीत वाजवलं आहे. १७ वर्षांचा मुंबईत राहणाऱ्या आयुषनेही त्याच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.