
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर ९ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. पण, या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या संघाला आणखी मोठा धक्का बसला होता. चेन्नईचा स्टार सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.