
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला ९ विकेट्सने पराभूत केले. यासह या हंगामातील पहिल्याच सामन्यात चेपॉकवर झालेल्या पराभवाची परतफेडही मुंबईने केली.
रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईने सामना जिंकत या हंगामातील सलग तिसरा, तर एकूण चौथ्या विजयाची नोंद केली. चेन्नईचा मात्र हा ८ सामन्यांतील सहावा पराभव ठरला आहे.
चेन्नईने मुंबईसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग मुंबईने १५.४ षटकात १ विकेट गमावत पूर्ण केला. मुंबईसाठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची आक्रमक फलंदाजी महत्त्वाची ठरली.