'माझ्याकडेच बघणार की बॉल देखील टाकणार?' किस्सा धोनीचा

CSK Thrower Kondappa Raj Palani Talk about MS Dhoni
CSK Thrower Kondappa Raj Palani Talk about MS Dhoni esakal

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) यंदाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. चारवेळा विजेतेपदाला गवसणी घालणारी सीएसके गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिली. दरम्यान, हंगाम अर्ध्यावर असताना रविंद्र जडेजाने नेतृत्व सोडले आणि महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा कर्णधार झाला. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल संघातील थ्रोडाऊन स्पेशलिस्ट कोंडप्पा राज पलानी यांनी एक किस्सा सांगितला.

CSK Thrower Kondappa Raj Palani Talk about MS Dhoni
शोएब अख्तर म्हणतो; विराटला आणखी घसरण पाहू शकत नाही

कोंडप्पा राज पलानीने चेन्नई सुपर किंग्जच्या वेबसाईटसाठी दिलेल्या मुलाखतती धोनी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता त्यावेळीचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, 'ज्यावेळी पहिल्यांदा कँप सुरू झाला त्यावेळी धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी मी पहिल्यांदा धोनीला पाहिले. त्यावेळी त्याने माला तू थ्रोअर आहेस का असे विचारले. त्याने माला चेंडू फेकण्यास सांगितला. नेट बॉलर त्याच्या निवृत्तीबाबत बोलत होते. दोन किंवा तीन आठवड्यानंतर साईड आर्म खेळण्यासाठी सर्वजण आले.'

यावेळी फ्लेमिंग, हसी आणि सर्वांनी सांगितले की धोनी येतोय. मला सावधगिरी बाळगून त्याला गोलंदाजी करायची आहे. त्यावेळी मी नर्वस झालो आणि पहिले दोन चेंडू वाईड टाकले. पुढचा चेंडू फूलटॉस टाकला. धोनी माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की मला पाहणे बंद कर आणि गोलंदीज कर. त्याने मला स्वाभाविक पद्धतीने गोलंदीज करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्याला हव्या त्या ठिकाणी गोलंदीज करू लागलो. त्यानंतर तो खूप खूष झाला. तेव्हापासून धोनी मला माझ्या नावाने बोलवतो.'

CSK Thrower Kondappa Raj Palani Talk about MS Dhoni
'वृद्धीमान हट्टी पोरगा, त्याला ना हरकत प्रमाणपत्र द्यावेच लागेल'

आयपीएलच्या 15 व्या हंगामात धोनीने 14 सामन्यात 33.14 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी देखील केली होती. हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते. संघाची धुरा रविंद्र जडेजाच्या खांद्यावर आली होती. मात्र आठ सामन्यांनंतर जडेजाने कर्णधारपद सोडले आणि पुन्हा धोनी सीएसकेचा कर्णधार झाला. धोनीने आपण पुढचा आयपीएल हंगाम खेळणार असल्याचे यापूर्वीच संकेत दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com