IPL 2024 : 'माही भाई...' ऋतुराज गायकवाडने सांगितला CSK vs RCB सामन्याचा टर्निंग पॉइंट

CSK vs RCB IPL 2024 Ruturaj Gaikwad : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 ची सुरुवात विजयाने केली आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यात सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला.
CSK vs RCB IPL 2024 Ruturaj Gaikwad Marathi News
CSK vs RCB IPL 2024 Ruturaj Gaikwad Marathi Newssakal

CSK vs RCB IPL 2024 Ruturaj Gaikwad : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 ची सुरुवात विजयाने केली आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यात सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा हा पहिला विजय आहे. या सामन्यातून गायकवाडने कर्णधार म्हणून पदार्पण केले आणि पहिली टेस्ट पास केली. सीएसकेच्या बालेकिल्लात पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरूने 174 धावा केल्या, जे चेन्नई सुपर किंग्जने 18.4 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. चेन्नईच्या या विजयानंतर कर्णधार गायकवाडने फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट असल्याचे सांगितले.

CSK vs RCB IPL 2024 Ruturaj Gaikwad Marathi News
CSK vs RCB IPL 2024 : आठवडाभरापूर्वी स्ट्रेचरवर गेला होता मैदानाबाहेर... अन् IPL च्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला 'सामनावीर'

कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकल्यानंतर गायकवाड म्हणाला की, सुरुवातीला 2-3 षटके सोडली तर सामन्यावर आमचा कंट्रोल होता. अजून 10-15 धावा कमी झाल्या असत्या तर मला आवडल असत, पण शेवटी त्याने चांगली कामगिरी केली. आणि मॅक्सवेल आणि फॅफची विकेट हे मोठे टर्निंग पॉइंट होते. आम्हाला तीन झटपट विकेट मिळाल्या ज्यामुळे पुढच्या काही षटकांमध्ये आम्ही सामन्यावर नियंत्रित करण्यात मदत झाली.

पुढे तो म्हणाला की, खरं सांगायचे झाले तर माही भाई होता, त्यामुळे सामन्यादरम्यान मला कर्णधारपदाचा अजिबात दबाव जाणवला नाही. हे कसे हाताळायचे हे मला माहीत आहे. आणि मी नेहमीच कर्णधारपदाचा आनंद लुटला आहे.

CSK vs RCB IPL 2024 Ruturaj Gaikwad Marathi News
IPL 2024 PBKS vs DC : सर्वांच्या नजरा पंतच्या खेळीवर... कोण ठरणार कोणावर भारी... किती वाजता रंगणार थरार?

सामन्याबद्दल बोलयाचे झाले तर, आरसीबीने दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांच्यात पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली जी यश दयालने मोडली. या सामन्यात कर्णधार 15 धावा करू शकला. अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. रहाणे आणि रचिन रवींद्र यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. 27 धावा करू शकणाऱ्या रहाणेच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिशेलने दोन षटकारांच्या मदतीने 22 धावा काढल्या.

जडेजा आणि दुबे यांच्यात मॅच विनिंग पार्टनरशिप

शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाने चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये 37 चेंडूत 66 धावांची नाबाद भागीदारी झाली. दुबेने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. त्याचवेळी या स्टार अष्टपैलूने 17 चेंडूत 25 धावा केल्या. या सामन्यात दोन्ही फलंदाज अपराजित राहिले. आरसीबीतर्फे कॅमेरून ग्रीनने 2 तर यश दयाल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com