
CSK vs RCB IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन बलाढ्य संघांमध्ये दक्षिण डर्बी आज पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि जेव्हा जेव्हा हे संघ भिडले आहेत, तेव्हा एक थरारक सामन्यांची अनुभूती आली आहे. पण, जेव्हा चेन्नईच्या चेपॉकचा विषय येतो, तेव्हा २००८ नंतर RCB ला इथे यजमान CSK वर एकही विजय मिळवता आलेला नाही. येथे खेळलेल्या ९ पैकी ८ लढती चेन्नईने जिंकल्या आहेत. मात्र, या लढतीच्या निमित्ताने 'माहीरत' अर्थात महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी एक वेगळीच पर्वणी असते.