CSK vs RCB IPL 2024 : गतविजेत्या चेन्नईने केली धडाक्यात सुरूवात, आरसीबीची पाटी मात्र राहिली कोरी

IPL 2024: 1st Match CSK vs RCB Live Updates : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू भिडणार आहेत. यंदा आयपीएलमध्ये परंपरा मोडली जाणार आहे. | CSK vs RCB Live Score
ipl
iplesakal

Chennai Super Kings Vs Royal Challengers Bengaluru Live Score IPL 2024 :

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात दमदार केली. त्यांनी पहिल्याच सामन्यात आरसीबीचे आव्हान परतवून लावले. आरसीबीने विजयासाठी 174 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र चेन्नईने आठ चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवत हंगामाची सुरूवात विजयाने केली.

चेन्नईकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमाननने प्रभावी मारा करत 4 षटकात 29 धावा घेत 4 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रचिन रविंद्रने 37 धावा केल्या तर शिवम दुबेने 34 धावा करत मॅच संपवली. रविंद्र जडेजाने 25 धावा करत दुबेला चांगली साथ दिली.

डॅरेल मिचेलने साथ सोडी मात्र जडेजाने सावरले

डॅरेल मिचेल 18 चेंडूत 22 धावा करून बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी चेन्नईचा डाव पुढे नेला. या दोघांनी सामना 30 चेंडूत 46 धावा असा जवळ आणला.

CSK vs RCB IPL 2024 live : सीएसकेचे आरसीबीला आक्रमक प्रत्युत्तर, 10 षटकात 100 पार

चेन्नई सुपर किंग्जने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 10 षटकात जवळपास 100 धावा ठोकल्या. अजिंक्य रहाणे 19 चेंडूत 27 धावा ठोकल्या. मात्र ग्रीनने त्याला बाद केलं.

रचिन रविंद्रचा धडाका अखेर करन शर्माने रोखला

रचिन रविंद्रने 15 चेंडूत 37 धावा चोपल्या. त्याला अजिंक्य रहाणेने देखील चांगली साथ दिली. या दोघांनी संघाला 7 षटकांच्या आतच 70 धावांच्या पार पोहचवले. अखेर रविंद्रला करन शर्माने बाद केलं.

चेन्नईची दमदार सुरूवात मात्र कर्णधार गमावला

चेन्नईने आरसीबीच्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली होती. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि आक्रमक रचिन रविंद्रने 4 षटकात 38 धावा चोपल्या. मात्र यश दयालने सीएसकेला पहिला धक्का दिला. त्याने 15 चेंडूत 15 धावा करणाऱ्या गायकवाडला बाद केलं.

CSK vs RCB IPL 2024 live : अनुज-कार्तिकची फटकेबाजी, आरसीबीने चेन्नईला दिलं तगडं आव्हान

अनुज रावत आणि दिनेश कार्तिकने सहाव्या विकेटसाठी 50 चेंडूत 95 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. अनुजने 25 चेंडूत 48 तर दिनेश कार्तिकने 25 चेंडूत 38 धावा केल्या. या जोरावर आरसीबीने 20 षटकात 6 बाद 173 धावा केल्या.

CSK vs RCB IPL 2024 live : अनुज रावतची धडाकेबाज फलंदाजी, कार्तिकचीही मिळाली साथ, आरसीबीने डाव सावरला

आरसीबीची अवस्था 5 बाद 78 धावा अशी झाल्यानंतर अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. अनुजने 22 चेंडूत 41 धावा ठोकल्या. त्यामुळे आरसीबी 18 षटकात 148 धावांपर्यंत पोहचला.

CSK vs RCB IPL 2024 live : मुस्तफिजूरने आरसीबीचा झंजावात थोपवला; चार धक्के देत अवस्था केली बिकट

मुस्तफिजूर रहीमने अवघ्या दोन षटकात 4 विकेट्स घेत आरसीबीची अवस्था बिकट केली. आरसीबीने आपल्या चार विकेट्स घेतल्या. त्याने विराट कोहली, फाफ ड्युप्लेसिस, कॅमरून ग्रीन रजत पाटीदार यांची शिकार केली. यामुळे आरसीबीची अवस्था 12 षटकात 5 बाद 79 धावा अशी केली.

आरसीबाला पाठोपाठ दोन धक्के

ड्युप्लेसिस बाद झाल्यानंतर आलेल्या रजत पाटीदारला देखील आल्या पावली माघारी धाडले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला दीपक चाहरने शुन्यावर बाद केले. मुळे आरसीबीची अवस्था बिनबाद 41 वरून 3 बाद 42 धावा अशी झाली. पॉवर प्लेमध्ये 42 धावा केल्या. मात्र त्यांनी तीन विकेट्स गमावल्या.

मुस्तफिजूरने दिला पहिला धक्का 

आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 23 चेंडूत दमदार 35 धावा केल्या होत्या. मात्र मुस्तफिजूरने आपल्या पहिल्याच षटकात त्याला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

आरसीबीचा आक्रमक सुरूवात 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने आक्रमक सुरूवात केली. ड्युप्लेसिसने आक्रमक खेळत आरसीबीला 2 षटकात 16 धावांपर्यंत पोहचवलं.

चेन्नईच्या संघाकडून समीर रिझवी करणार पदार्पण 

चेन्नईच्या संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने प्लेईंग 11 निवडणे जिकिरीचे होते. पथिराना आणि कॉन्वे हे खेळत नाहीयेत. त्यामुळे मिचेल, रचिन, फिज आणि तिक्षाणा या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. त्याचबरोबर समीर रिझवीला देखील पदार्पणाची संधी मिळाली आहे.

CSK vs RCB IPL 2024 live : फाफ ड्युप्लेसिसने जिंकली नाणेफेक, ऋतुराजची परीक्षा सुरू

आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचा कर्णधार म्हणून ऋतुराजची परीक्षा आता सुरू झाली आहे.

CSK vs RCB IPL 2024 live : नाणेफेकीचा कौल असणार महत्वाचा, ऋतुराजची परीक्षा सुरू

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेपॉकवर नाणेफेकची कौल महत्वाचा ठरणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

आयपीएलच्या सुरूवातींच्या सत्रात मिस्टर आयपीएल सुरेश रैना हा टॉप रन गेटर होता. मात्र कालांतराने किंग कोहलीने त्याला मागे टाकले.

आयपीएलच्या प्रत्येक संघाचे विन - लॉस स्टॅट

CSK vs RCB IPL 2024 live : तिरंगा.. टायगर... अक्षय! सारे जहाँ से अच्छाने सुरू झाला उद्घाटन सोहळा

आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने तिरंगा हातात घेत सुरूवात केली.

ओरी करणार उद्घाटन सोहळ्यात कॉमेंट्री 

आयपीएलपूर्वी एक धडाकेबाज उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला टायर श्रॉफ, अक्षय कुमार, एआर रहमान आणि सोनू निगम उपस्थिती लावणार आहेत. याचबरोबर ओरी हा देखील समालोचन करताना दिसेल.

चेन्नई अन्आरसीबी हेड टू हेड मध्ये कोण आघाडीवर

चेन्नईने आरसीबीविरूद्ध 31 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला चेन्नई विरूद्ध फक्त 10 सामनेच जिंकता आले आहेत.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात दमदार केली. त्यांनी पहिल्याच सामन्यात आरसीबीचे आव्हान परतवून लावले. आरसीबीने विजयासाठी 174 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र चेन्नईने आठ चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवत हंगामाची सुरूवात विजयाने केली.

चेन्नईकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमाननने प्रभावी मारा करत 4 षटकात 29 धावा घेत 4 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रचिन रविंद्रने 37 धावा केल्या तर शिवम दुबेने 34 धावा करत मॅच संपवली. रविंद्र जडेजाने 25 धावा करत दुबेला चांगली साथ दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com