VIDEO : ऋतुराजचं ये रे माझ्या मागल्या; माजी सहकाऱ्याने साधला डाव

Ruturaj Gaikwad struggling lbw against Josh Hazlewood
Ruturaj Gaikwad struggling lbw against Josh HazlewoodSakal

चेन्नई सुपर किंग्जला मागील हंगामात जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावणारा यंदाच्या हंगामात संघाची डोकेदुखी ठरतोय. गत हंगामातील ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याने दुहेरी आकडा पार केला. पण माजी सहकारी जोस हेजलवडूने (Josh Hazlewood) त्याचा 17 धावांवर तंबूत धाडले. पायचित झाल्यावर ऋतुराजने रिव्ह्यू घेतला. पण त्याचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरला आणि त्याला मैदानात सोडावे लागले. त्याच्या या ढिसाळ कामगिरीमुळे पाचव्या सामन्यात पुन्हा चेन्नई सुपर किंगजचा संघ अडचणीत सापडला आहे.

गत हंगामात उपविजेता राहिलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यातून चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामाला सुरुवात केली. या सामन्यात सलामी जोडीनं अवघ्या 2 धावांची भागीदारी केली. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सलामी जोडीनं 28 धावांची भागीदारी केली. पंजाब विरुद्ध 10 तर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सलामी जोडीला अवघ्या 25 धावांपर्यंत मजल मारली. आज पुन्हा सलामी जोडीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. धावफलकावर 19 धावा असताना ऋतूराज गायकवाड तंबूत परतला. सलग पाचव्या सामन्यात ऋतूराज नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com