
महेंद्रसिंग धोनीने भारतीय कर्णधारपदाचा बॅटन विराट कोहलीकडे पास केला होता. विराटबरोबर आपले नाते जवळच्या मित्रासारखे होते, असे काही दिवसांपूर्वीच वक्तव्य करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील लढतीची मेजवानी उद्या आयपीएल चाहत्यांना मिळणार आहे.
पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई आणि अजूनही पहिल्या वहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या बंगळूर यांच्यात उद्या सामना होत आहे. विराट आपला जवळचा मित्र असल्याचे धोनी सांगत असला तरी उद्या विराटला रोखण्यासाठी तो कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या मार्फत कशी रणनीती आखतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.