IPL 2024 CSK vs RR : सीएसकेच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत; राजस्थानचा 5 विकेट्सनी केला पराभव

CSK vs RR Live Scorecard Updates IPL 2024 : रविवारी आयपीएल 2024 चा 61 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे.
CSK vs RR
IPL 2024 CSK vs RResakal

IPL 2024 CSK vs RR Live Score : सीएसकेच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत; राजस्थानचा 5 विकेट्सनी केला पराभव

चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचे 142 धावांचे आव्हान 18.2 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. कर्णधार ऋतुराजने नाबाद 42 धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

IPL 2024 CSK vs RR Live Score : चेन्नईला तीन धक्के, राजस्थानचा कमबॅक करण्याचा प्रयत्न

पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केल्यानंतर सीएसकेच्या फलंदाजांना रोखण्यात राजस्थानच्या गोलंदाजांना यश आलं. त्यांनी सीएसकेचे 3 फलंदाज बाद केले. सीएसकेने 13 षटकात 3 बाद 92 धावांपर्यंत मजल मारली आहे.

IPL 2024 CSK vs RR Live Score : चेन्नईची दमदार सुरूवात; 7 षटकात चोपल्या 66 धावा

चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचे 142 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सीएसकेने 7 षटकात 1 बाद 66 धावा केल्या. रचिन रविंंद्र 27 धावा करून बाद झाला. मिचेल 22 तर गायकवाड 14 धावा करून नाबाद आहेत.

IPL 2024 CSK vs RR Live Score : रियान परागची एकाकी झुंज; राजस्थानने दिले 142 धावांचे आव्हान

राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 141 धावा केल्या. रियान परागने 47 धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईकडून सिमरजीत सिंग 3 तर तुषार देशपांडेने 2 विकेट्स घेतल्या.

IPL 2024 CSK vs RR Live Score : राजस्थानची संथ फलंदाजी; सिमरजीतने पाडलं खिंडार

सिमरजीतने दोन्ही सलामीवीरांपाठोपठ संजू सॅमसनला देखील बाद केलं. राजस्थानने 17 षटकात 3 बाद 113 धावा केल्या. रियान पराग 33 तर ध्रुव जुरेल 11 धावा करून नाबाद होते.

IPL 2024 CSK vs RR Live Score : चेन्नईने राजस्थानला दिले दोन धक्के;

राजस्थानचे दोन्ही सलामीवीर संघाचे अर्धशतक होण्यापूर्वीच बाद झाले. सिमरजीत सिंगने यशस्वी जयस्वालला 24 धावांवर तर बटलर 21 धावांवर बाद केलं. राजस्थानच्या 8 षटकात 2 बाद 49 धावा झाल्या आहेत.

राजस्थानने नाणेफेक जिंकली

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने राहणे ऐवजी रचिन आणि ऋतुराजला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. तर राजस्थानच्या संघात ध्रुव जुरेल परतला आहे.

IPL 2024 CSK vs RR Live Score : संजू प्लेऑफच्या तिकीटापासून एक पाऊल दूर, धोनीची शेवटची होम मॅच?

चेन्नईसमोर आज रविवारी दुपारी आपल्या घरच्या मैदानावर फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे. ....

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -

CSK vs RR : थाला चेन्नईमध्ये शेवटचा IPL सामना खेळणार? गतविजेत्या CSK चा लौकिक पणास; राजस्थानसमोर लागणार कस

Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Score IPL 2024 :

चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनी पराभव करत आपल्या प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. सीएसकेने राजस्थानचे 142 धावांचे आव्हान 18.2 षटकात पार केलं. या विजयासोबतच सीएसकेने 14 गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

सीएसकेकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद 42 धावा केल्या. त्याला डॅरेल मिचेलने 22 रचिन रविंद्रने 27 धावा करून चांगली साथ दिली. शिवम दुबेने 18 तर समीर रिझवीने 8 चेंडूत 15 धावा केल्या. राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या 61 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून 20 षटकात 5 बाद 141 धावा केल्या. चेन्नईने चांगला मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच वेसन घातले. सिमरजीत सिंगने जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांना बाद केलं. रियान परागने राजस्थानकडून सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याला ध्रुव जुरेलने 18 चेंडूत 28 धावा करून चांगली साथ दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com