व्हिटोरीने बीसीसीआयकडे केली मागणी; उमरान मलिकला वाचवायचे असेल तर... | Daniel Vettori Saving Umran Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daniel Vettori Saving Umran Malik

व्हिटोरीने बीसीसीआयकडे केली मागणी; उमरान मलिकला वाचवायचे असेल तर...

मुंबई : सनराईजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (Umran Malik) भन्नाट वेगाचे फक्त भारतीयांवरच नाही तर संपूर्ण जगावर गारूड निर्माण झाले आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीने (Daniel Vettori) या युवा वेगवान गोलंदाजाला तर हिरोची उपमा दिली आहे. तो म्हणाला की या युवा खेळाडूचा वेग धडकी भरवणारा आहे. त्यामुळे त्याचा वर्कलोड (Workload) योग्य प्रकारे हाताळला पाहिजे. व्हिटोरी म्हणाला की, ब्रेट ली, शोएब अख्तर आणि शॉन टेट यांचा काळ संपल्यानंतर अशा प्रकराचा गोलंदाज पाहण्यात आला नव्हता. ही एक विरळ अशी प्रतिभा आहे.

हेही वाचा: स्टार फुटबॉलपटू ओझिलने भारतातील मुस्लीमांसाठी केली प्रार्थना, झाला ट्रोल

डॅनियल व्हिटोरीने एका वेबसाईटसाठी बोलताना सांगितले की, 'उमरान मलिकचा वेग फलंदाजांना धडकी भरवणारा आहे. तो सर्वच फलंदाजांना आपल्या वेगाने भांबावून सोडत आहे. आपल्याला 153 - 154 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज फारसे पहायला मिळत नाहीत. तो खूप वेगावान आहे. अशी प्रतिभा आपण ब्रेट ली, शोएब अख्तर आणि शॉन टेट यांच्यानंतर पाहिली नाही.'

विटोरी पुढे म्हणाला, 'त्याच्या वेगामुळे सामन्यात एक रोमांच निर्माण होतो. सामन्यात तो एक एक्स फॅक्टर असतो. तो एक हिरो आहे आणि आता फक्त भारतीय क्रिकेटमध्ये त्याची येत्या दोन वर्षात कशा प्रकारे देखभाल होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.'

हेही वाचा: विराट कोहलीला चढलाय पुष्पा फिवर,बघा 'ओ अंटावा' गाण्यावर विराट देतोय ठुमके

उमरान मलिकच्या वर्कलोड बाबत व्हिटोरी म्हणाला की, 'जर उमरान मलिक बीसीसीआय (BCCI) किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (National Cricket Academy) छत्रछायेखाली आला तर त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असले. बीसीसीआय त्याच्या वर्कलोडचे मॅनेजमेंट करू शकते. एखाद्या गोलंदाजाला वेगात गोलंदाजी करण्याचा मोह असतो. मी शेन बाँड सोबत बोललो आहे. त्याच्या बोलण्यावरून मी सांगतोय की तुम्ही जितकी गोलंदाजी करत जाल तेवढा तुमचा वेग कमी होत जातोय. भारतीय उपखंडात तुम्हाला नेट बॉलर म्हणून वापरले जाते. तुम्ही दौऱ्यावर जाता. त्यामुळे तुमचा कार्यभार थोडा वाढतो.'

Web Title: Daniel Vettori Say For Saving Umran Malik Bcci Should Plan Work Load Management

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top